शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त भागाची पाहणी व आवश्यक खाद्य पदार्थ वाटप
चंद्रपूर: शहरातील सिस्टर कॉलनी, रहमतनगर, पठाणपुरा प्रभागातील मोहमदियानगर येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे शेकडो नागरिक बेघर झालेत. यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्तांच्या परिसरात भेट देऊन आस्थेने विचारपूस करण्यात आली. तसेच नागरिकांना खाद्यपदार्थाचे वितरण करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेलभाई शेख, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, पप्पू सिद्दीकी, मनीष तिवारी, कुणाल चहारे, भालचंद्र दानव, नौशाद शेख, ताजुद्दीन शेख, राधिका बोहरा, आकाश तिवारी, केतन दूरसेलवार, काशीफ़ अली, यश तिवारी, यांची उपस्थिती होते. पूरपीड़ित नागरिकांनी मदतीसाठी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधवा. काँग्रेसचे कार्यकर्ते मदतीसाठी सदैव तयार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी म्हटले आहे.



