राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करणार

0
142

आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २५ : राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.

आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत याबाबत चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here