चंद्रपूर,दि. 29 : काल दिनांक 28 जानेवारी रोजी चंद्रपूर वनविभागा अंतर्गत भद्रावती परिक्षेत्रातील नियतक्षेत्र चिपराळा येथे कक्ष क्रमांक 210 मध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान दुपारच्या सुमारास वन्यप्राणी वाघ (नर) मृत अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती विभागीय वन अधिकारी एस.व्ही.जगताप यांना मिळताच त्यांनी क्षेत्रीय कर्मचारी यांचेसह घटनास्थळी जावून पाहणी केली असता मृत वाघ कुजलेल्या व शाबुत अवस्थेत आढळून आला. सदर मृत वाघाचे शवविच्छेदन डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजिव), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, डॉ. इ.डी.शेडमाके, पशुधन विकास अधिकारी, भद्रावती व डॉ राहूल सी.शेंद्रे, पशुधन विकास अधिकारी, वरोरा यांनी एन.आर.प्रविण, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर, श्री बंडु धोतरे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे सदस्य, श्री मुकेश भांदककर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजिव) यांचे प्रतिनीधी, एस.व्ही.जगताप, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर, श्री एस.एल.लखमावाड, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर व श्री एम.पी.राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) भद्रावती यांचे समक्ष (Standard Operating Procedure) मानक कार्यपध्दती सुचना नुसार करण्यात येवून दहन करण्यात आले. मृत वाघाचा एक दात झिजून तूटलेल्या अवस्थेत व तीन दात, मिश्या व नखे शाबुत अवस्थेत आढळून आले. शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असून सदर वाघाचा मृत्यू वृध्दाप काळाने नैसर्गीकरीत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे चंद्रपूर वनवृत्ताच्या विभागीय वन अधिकारी एस.व्ही.जगताप यांनी कळविले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला 'झिरोधा'चा प्रतिसाद
मुंबई. दि. 23 : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेडला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
चंद्रपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमी., ला आर्थिक वर्ष 2022 2023 करिता उत्कृष्ट कामगिरीबद्दल " दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅक्स् फेडरेशन लिमी., मुंबई...
सार्वजनिक कार्यक्रमात पेपर ब्लोवर मशीनवर बंदी
दंड व फौजदारी कारवाई होणार
चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे...
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर
वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या...
साप्ता. ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का 43 वें वर्ष में पदार्पण
चंद्रपुर: 42 वर्ष पूर्व आज के ही दिन 15 अगस्त 1981 को हिंदी पत्रकारिता के क्षितिज पर साप्ताहिक अखबार ‘चंद्रपुर एक्सप्रेस’ का उदय हुआ...



