जिल्ह्यात मागील 24 तासात 119 कोरोनामुक्त

0
168

71 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू
आतापर्यंत 15,252 बाधित झाले बरे
उपचार घेत असलेले बाधित 2,191
चंद्रपूर, दि. 16 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 119 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 71 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्या बाधितामध्ये कटवाल, ता. भद्रावती येथील 67 वर्षीय पुरुष, बुद्ध नगर वार्ड, बल्लारशा येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 274 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 255, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 10, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 71 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 717 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 119 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 हजार 252 झाली आहे. सध्या 2 हजार 191 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 30 हजार 656 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 11 हजार 622 नमुने निगेटीव्ह आले आहे.
नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here