महाकाली मंदिरात भाविकांसाठी प्रवेश बंदच

0
229

नवरात्र काळात घरीच मातेची सेवा करा-सुनील महाकाले

चंद्रपूर: शनिवार १७ ऑक्टोंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात भाविकांसाठी श्री महाकाली मंदिरात प्रवेश बंदच राहणार असून भाविकांनी घरीच श्री महाकाली मातेची सेवा व आराधना करावी असे आवाहन महाकाली मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त सुनील महाकाले यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांना सर्वसाधारण भाविकांसाठी उघडण्याची परवानगी अद्याप मिळाली नाही.पण मंदिरात देवीची पूजा रोज नित्य नियमाने कोरोना आचारसंहितेचे पालन करून सुरू आहे. नवरात्री उत्सवासाठी नेहमी प्रमाणे घटस्थापना करून नवरात्र उत्सव प्रारंभ होईल.या काळात पंचक्रोशीतील भाविक दर्शनाला येतात. हा भाविकांच्या श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे अनेकांचे पाय मंदिराकडे वळतात.यंदा कोरोनाचे सावट लक्षात ठेवून भाविकांनी स्वतःला आवर घालावा.घरीच मातेचे ध्यान करावे.भाविकांसाठीमंदिरात प्रवेश राहणार नाही.याची समस्त भाविकांनी नोंद घ्यावी,असे आवाहन श्री महाकाली मंदिरचे विश्वस्त सुनील महाकाले यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here